दहिवडी प्रतिनिधी
दहिवडी (ता शिरूर) आणि पंचक्रोशी मध्ये गेल्या आठवड्यापासून किमान तापमानात घट होत असल्याचे स्पष्ट झाले होते त्यामध्येच कधी वादळासारखी परिस्थिती व कधी पावसाची परिस्थिती अशा वातावरणामध्ये बदलाचे परिणाम घडवून सोमवारी पहाटेपासूनच धुके असल्याचे दिसून आले सकाळी सहा ते आठ पर्यंत दुलई अनुभवण्याची संधी मिळाली अनेकांनी मोबाईल मध्ये दृश्य टिपण्याचा प्रयत्न केला.
तसेच दहिवडी, उरळगाव, भांबर्डे, कळंतवाडी, पारोडी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात धुक्यांची साम्राज्य पाहायला मिळाले तसेच या धुक्यांबरोबरच पावसाचे बारीक बारीक थेंबही पडताना दिसून आले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे,कारण हाता-तोंडाशी आलेला कांदा,कोबी,हरभरा, मका या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे दैनंदिन वातावरणामध्ये असा सारखा बदल घडत असल्याने परिसरातील शेतकरी चिंतेमध्ये आहेत.