सुनील भंडारे पाटील
वढू बुद्रुक (तालुका शिरूर), वढू खुर्द (तालुका हवेली) या दोन्ही गावांच्या मधील भीमा नदी पात्रात तरंगत असलेला मृतदेह नेमका कोणाच्या हद्दीत यामुळे तासनतास मृतदेह पाण्यात पडून राहिला, मृतदेह पाहण्यासाठी आज सकाळपासून बघ्यांनी गर्दी केली होती,
अंदाजे मध्यमवयीन पुरुष जातीचा, विटकरी रंगाचा शर्ट, काळी पॅन्ट असलेला मृतदेह पाण्यात अजूनही तरंगत आहे, धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ वढू बुद्रुक ला येण्यासाठी तुळापूर वरून येण्यासाठी या दोन्ही गावाला जोडणाऱ्या बंधाऱ्यावरून मार्ग असल्याने,
तसेच आज प्रजासत्ताक दिन असल्याने शंभू भक्तांची या बंधाऱ्यावरून दाट ये-जा होती आज सकाळपासूनच संबंधित मृतदेह दिसत असल्याने, बघयांनी गर्दी केली होती, मृतदेह तासंतास पडून राहिल्याने लोकांकडून हळहळ व्यक्त होत होती, दोन्ही गावच्या ग्रामस्थांपैकी काही बऱ्याच लोकांनी शिक्रापूर आणि लोणीकंद पोलीस स्टेशन यांना कळून देखील पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला उशीर झाला, त्यामुळे मृतदेहा बाबत नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे,