सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथील अल अमीन कॉलेज कॅम्पस मध्ये 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष नासीर शेख, संस्थेचे वरिष्ठ संचालक रफिक शेख, संस्थेचे सहसचिव जाहिद शेख, संस्थेचे विशेष कार्य अधिकारी अमीर इनामदार तसेच ग्लोरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका रुमाना शेख, डीलाईट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. एस डी नवले, डिलाईट कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. ए एम शेख, ग्लोरी सायन्स कॉलेजचे प्राचार्य अनिल मिश्रा, ग्लोरी स्कूलच्या प्राचार्या अंजुम शेख, इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. जितेंद्र शिंदे, आयुर्वेदिक हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. अमित लिंगायत तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्लोरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. अध्यक्ष नासिर शेख यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्व विद्यार्थी शिक्षक व पालकांना शुभेच्छा दिल्या.