सुनील भंडारे पाटील
वढु खुर्द (तालुका हवेली) येथील लोणीकंद फाटा आळंदी रस्त्यावर एका कंटेनर चालकाचा हत्याराने खून करून त्याला चालक केबिन मध्ये सोडून अज्ञात आरोपी फरार झाला आहे,
याबाबत कंटेनर चे मालक संजय रामफल कालीरामना राहणार 404 बिल्डिंग नंबर बी टू शुभम ग्रीन सिटी सोसायटी रजवाडी हॉटेल जवळ, पारडी जिल्हा वलसाड वापी यांनी लोणीकंद पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून, लोणीकंद पोलीस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार कंटेनरचा चालक शहजाद अब्दुलक्युम अहमद याचा 26,1, 2023 रोजी 5 वाजण्याच्यापूर्वीस ( नक्की तारीख वेळ माहिती नाही) कंटेनर उभा असलेल्या ठिकाणी वढू खुर्द गावचे हद्दीत लोणीकंद फाटा ते तुळापूर रस्त्यावर हॉटेल सीताईचे समोर कोणीतरी अज्ञात इसमाने, अज्ञात कारणावरून हत्याराने ड्रायव्हर शहजाद अब्दुलक्युम अहमद वय 26 वर्ष राहणार पोखर भेटवा, बिशून पूर्वा, जिल्हा बस्ती उत्तर प्रदेश, याच्या डोक्यात मारून खून केला आहे,
संबंधित कंटेनर नंबर DN09R9058 हा जिंदल फायबर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी धर्मपुरी तामिळनाडू येथून सीट कव्हर साठी लागणारे रेग्झिन हा माल भरून एल अँड एल प्रॉडक्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चाकण एमआयडीसी येथे पोहोचणार होता, परंतु मध्यंतरी वढू खुर्द तालुका हवेली येथील लोणीकंद फाटा ते आळंदी रस्त्यावर हा खुणाचा प्रकार घडला, पुढील तपास लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास पाटील करत आहेत,