सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) आणि परिसरातील गावांमध्ये गुरुवारी सायंकाळी अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेती पिकाचे नुकसान, तसेच बऱ्याच कालावधीसाठी विद्युत पुरवठा विस्कळीत झाला होता,
गेल्या दोन दिवसांपासून वातावरण आकाश ढगाळ होते, या भागात मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्र असून, सद्यस्थितीत कारखान्यांच्या ऊस तोडी चालू आहेत, नवीन लागवडी, खोडवा उगवत्या ऊस पिकाला, जरी हा पाऊस फायद्याचा असला तरी, ओलसर ऊस बागायत शेती, चिखलमय ओलसर रस्ते यामुळे ऊस तोडीला, वाहतुकीला अडथळा येणार आहे, तरकारी पिके देखील या वळवाच्या अवकाळी पावसामुळे धोक्यात येणार आहेत, टोमॅटो, हरभरा, कोबी, फ्लॉवर, गहू, या पिकांचे नुकसान झाले असून, कसाबसा सावरलेला शेतकरी पुन्हा अडचणीत येण्याची चिन्ह दिसत आहेत, आज सायंकाळी कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक आणि आसपासच्या गावांमध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे बराच वेळ विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता,