माहिती व जनसपंर्क महासंचालनालय पुणे विभागीय माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर यांनी घेतली पत्रकारांची भेट

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
                पेरणे फाटा (तालुका हवेली) येथे
माहिती व जनसपंर्क महासंचालनालय पुणे विभागीय माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर यांनी पत्रकारांची विशेष भेट घेऊन हितगुज, व मार्गदर्शन केले यावेळी परिसरातील पत्रकार उपस्थित होते,         
पत्रकारांचे समाजा मधील महत्व अनन्यसाधारण असून, सद्यस्थितीत पत्रकारांनी समाजात काम करत असताना स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे, पत्रकारांना निशुल्क पद्धतीने काम करावे लागते, माध्यमांचे संपादक किती मानधन देतात हे देखील काही कळायला तयार नाही, मी फक्त पत्रकार म्हणून सर्वांना ओळखतो पत्रकार संघटना हा वेगळा भाग आहे,पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण पुणे जिल्हास्तरीय कार्यशाळा घेणार आहोत, तुम्ही तुमच्या सोयीनुसार ठिकाण ठरवून सांगा त्या पद्धतीने कार्यक्रमाचे नियोजन केले जाईल, आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमचा संपर्क सर्वात जास्त पत्रकारांशी असतो, पत्रकारांचे काही अडीअडचणी असल्यास कुठल्याही प्रकारची शंका न ठेवता बिनधास्त बोलावे पत्रकार ची सर्व कामे मार्गी लावणार असल्याचे यावेळी पाटोदकर यांनी सांगितले,     
 याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार शरद पाबळे, ज्येष्ठ पत्रकार के डी भाऊ गव्हाणे, भरारीचे संपादक सुनील भंडारे पाटील, पत्रकार सुनील भांडवलकर, पत्रकार सचिन धुमाळ, पत्रकार विठ्ठल वळसे, पत्रकार जितेंद्र आव्हाळे,पत्रकार गजानन गव्हाणे पाटील, पत्रकार उदयकांत ब्राह्मणे, आदी उपस्थित होते,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!