दहिवडी प्रतिनिधी
दहिवडी (ता. शिरुर) येथील गारगोटे वस्तीवर काल रात्री पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे मागील आठवड्यातच दहिवडी येथील नरेंद्र गायकवाड यांच्या घरातील कुत्रा बिबट्याने भक्ष केलेला होता व कालच पुन्हा गारगोटे वस्ती येथील शेतामध्ये भरत गारगोटे व गौरव गारगोटे मोटार बंद करण्यासाठी जात असताना त्यांना पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले,
बऱ्याच ठिकाणी शेतामध्ये बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आलेले दिसले आहेत, नुकतेच मागील आठवड्यात चासकमान धरणाचे आवर्तनाचे पाणी सुटल्याने पाण्याची समस्या दूर झाली परंतु बिबट्याने दहिवडी पंचक्रोशी मध्ये दहशत पसरवली आहे
यामुळे वारंवार दहिवडी परिसर व पंचक्रोशी मध्ये बिबट्याचे दर्शन घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे त्यामुळे शिरूर येथील वनविभागाने पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी ग्रामस्थांनी व दहिवडी गावच्या उपसरपंच पल्लवी सचिन गारगोटे यांनी केलेली आहे.