लोणी काळभोर पोलिसांकडून दारूभट्टी उद्वस्त

Bharari News
0
लोणी काळभोर प्रतिनिधी
      अवैधपणे हातभटटी दारु तयार करणाऱ्या अडयाचे लोणीकाळभोर पोलीस ठाणे
कडुन उध्वस्त मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर  रितेश कुमार व सह आयुक्त पुणे शहर  संदीप कर्णिक यांनी पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशिर धंदे करणारे, तसेच शरीर व मालाविरुदध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दशहत निर्माण करणारे सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करुन त्यांचे समुळ उच्चाटन करणे याबाबत पुणे शहरातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आदेश दिले आहेत.     
  दि.०४/०१/२०२३ रोजी लोणीकाळभोर पोलीस ठाणे कडील पो शि वीर यांना गोपनिय बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, रामदरा रोड, बल्लाळवस्ती ता.हवेली जिल्हा पुणे येथे गावठी हातभट्टी दारू तयार करणेकरीता हातभट्टीचे रसायन व साहित्यासह गावठी दारु बनवित आहेत' वगैरे मजकुराची खबर मा. वरीष्ठ पोलीस निरीक्ष दत्तात्रय चव्हाण यांना देऊन त्यांनी पोउपनि गोर व तपास पथक स्टाफ यांना सदर ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने त्याप्रमाणे नमुद पथकाने ११/१५ वा. चे सुमारास रामदरा रोड बल्लाळवस्ती ता.हवेली जिल्हा पुणे येथे छापा टाकला असता सदर ठिकाणी एका मोठया पत्र्याचे भांडयामध्ये गुळ, तुरटी व पाणी यांचे अंदाजे एक हजार लिटर रसायन व साहीत्यानिशी गावठी दारु बनवित असताना इसम नामे (१) शेखर मधुकर काळभोर वय ४५ वर्षे धंदा हातभट्टी व्यवसाय रा. बल्लाळवस्ती, रामदरारोड लोणीकाळभोर ता हवेली जि पुणे (२) रामकुमार जयप्रसाद लोधी वय २४ वर्षे धंदा मजुरी रा. रामदरा रोड, बल्लाळवस्ती लोणीकाळभोर पुणे मुळ रा हिडोलनी पोस्ट बनभरीया तहसील अमेठी जिला सुरतानपुर राज्य उत्तरप्रदेश हे मिळुन आले. सदर ठिकाणी असलेल्या रसायन व साहीत्याची पाहणी केली असता त्या ठिकाणी (१) १०,०००/- रु. किंमतीची एका मोठया पत्र्याचे भांडयात एक हजार लिटर गावठी हातभट्टी तयार करण्याचे पक्के रसायन. किं. अं. प्रती लि. १० रु. याप्रमाणे. (२) १,०००/- एक पत्र्याचे भांडे १००० लि. मापाचे जु. वा. किं. अं. असा एकुण ११,०००/- किंमतीचा माल मिळुन आला असुन नमुद मालापैकी आवश्यक तेवढे सॅम्पल करीता नमुना घेण्यात आल्यानंतर उर्वरीत माल जागीच नष्ट करण्यात आलेला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगीरी मा. रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर,  संदीप कर्णीक पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर,  विक्रांत देशमुख पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ - ५,  बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, दत्तात्रय चव्हाण वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली पोउपनि अमित गोरे,पोहवा गायकवाड, पोहवा पाटोळे, पोना नागलोत, पोना जाधव, पोशि पुंडे, पोशि वीर, पोशि कुदळे, पोशि पवार, पोशि सोनवणे यांच्या पथकाने केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!