विकासपर्व २०२३' दिनदर्शिकेचे आमदार अशोक(बापू) पवार माजी सभापती सुजाता (भाभी) पवार यांच्या शुभहस्ते प्रकाशन

Bharari News
0
      विकासपर्व २०२३'  दिनदर्शिकेचे  आमदार अशोक पवार माजी सभापती सुजाता पवार यांच्या शुभहस्ते प्रकाशित 
     आमदार अशोक पवार यांच्या शिरूर हवेली तालुक्यातील विकासकामांवर प्रकाशित विकासपर्व २०२३' ही दिनदर्शिका

 सुनील भंडारे पाटील
       सणसवाडी ( ता.शिरूर) येथे 'विकासपर्व २०२३' ही दिनदर्शिका शिरूर हवेलीचे  आमदार अशोक पवार  व माजी सभापती सुजाता पवार यांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आले.       
 शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रवींद्र  काळे यांच्या संकल्पनेतून शिरूर हवेली मतदारसंघात आमदार अशोक पवार यांनी  केलेल्या विकास कार्यावर प्रकाश टाकणारी हि दिनदर्शिका असून यामध्ये शिरूर हवेली मतदार संघाचा ज्या दूरदृष्टीने विकासाचा आलेख उंचावण्यासाठी करण्यात आलेल्या विकास कामांचा उल्लेख करण्यात आला आहे. 
  यावेळी  राष्ट्रवादी कांग्रेसचे शिरूर तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, खरेदी विक्री संघाचे माजी सभापती  राजेंद्र नरवडे , पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर,  मार्केट कमिटीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे,माजी पंचायत समिती सदस्य  पि के  गव्हाणे, सविता  दरेकर,  मनसेचे उपाध्यक्ष रामदास  दरेकर, माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, संजय गुरव, सणसवाडी ग्राम पंचायतीच्या  सरपंच संगिता हरगुडे, उपसरपंच दत्तात्रय हरगुडे, माजी उपसरपंच ॲड विजयराज दरेकर,  उद्योजक हरीश येवले, माजी सरपंच सुनंदा दरेकर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, अक्षय कानडे, राहुल हरगुडे, ग्रामपंचायत सदस्या शशिकला सातपुते, ललिता दरेकर, सुवर्णा दरेकर, रूपाली दरेकर, चेअरमन भैरवनाथ दरेकर, उद्योजक रामदास  दरेकर नवनाथ दरेकर , माऊली थेऊरकर, सुहास दरेकर, रामदास दरेकर, निलेश दरेकर, प्रशांत दरेकर, सूभाष दरेकर ,अशोक ढेरंगे, शाम दरेकर,  मयुर दरेकर, अशोक करडे , अनिल गोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
[  आमदार अशोक पवार व सुजाता पवार यांनी शिरूर हवेली तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. या विकास कामांच्या संदर्भात ही दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. या माध्यमातून आमदार अशोकबापू पवार यांचे विकासाचे दूर दृष्टिकोन सर्वसामान्य जनतेच्या घराघरात रुजविण्याचा प्रयत्न. आहे.
      - पंडित दरेकर ,सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती ]
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!