सुनील भंडारे पाटील
लोणीकंद (तालुका हवेली) पोलीस स्टेशन हद्दीमधील वढू खुर्द हद्दीत तुळापूर फाटा ते आळंदी रस्त्यावर हॉटेल सीताईचेसमोर दोन दिवसांपूर्वी एका कंटेनर ड्रायव्हरची हत्या झाली होती, ती हत्या करणाऱ्या आरोपीला लोणीकंद पोलिसांनी अवघ्या बारा तासात गजाआड केले,
26, 1,2023 रोजी संबंधित ठिकाणी कंटेनर ड्रायव्हर ड्रायव्हर केबिन मध्ये मृत अवस्थेत सापडला होता, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती, या संदर्भात खून करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल होती, आरोपीला पकडण्यासाठी लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तात्काळ दोन पथके रवाना केली, संबंधित कंटेनर तामिळनाडू वरून माल घेऊन चाकणला रवाना होणार होता, कंटेनर ड्रायव्हर म्हणून काम करीत असलेला शमशुल अली अहमद खान हा मयत शहजाद अब्दुल कयूम अहमद याचे सोबत तामिळनाडू पासून माल पोहोचवण्यासाठी आला होता, परंतु तो पोलीस तपासात टेंभुर्णी मार्गे नाशिककडे गेल्याचे समजले, संशयित म्हणून त्याला ताब्यात घेण्यात आले, त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, रस्ता चुकल्याचे कारणावरून झालेल्या वादातून त्याने शहजाद अब्दुल कयूम अहमद याचा खून केल्याची कबुली दिली, त्याला अवघ्या 12 तासात लोणीकंद पोलिसांनी अटक केली,
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग किशोर जाधव, लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, मारुती पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार, सुहास पाटील, गजानन जाधव, पोलीस अंमलदार कैलास उतले, सारंग दळे, अमित देशमुख, बाळासाहेब सकाटे, कैलास साळुंखे, सागर जगताप, विनायक साळवे, स्वप्निल जाधव, अमोल ढोणे, साईनाथ रोकडे, समीर पिलाने, पांडुरंग माने यांनी केली,