दहिवडी प्रतिनिधी
दहिवडी (ता शिरुर) येथे अनेक दिवसापासून बिबट्याचा वावर असून दिनांक 14 मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला सायंकाळी साडेपाच वाजता दहिवडीचे प्रसिद्ध बागायतदार प्रवीण सदाशिव दौंडकर यांच्या शेतामध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे,
प्रवीण सदाशिव दौंडकर यांच्या घरामधील कुत्र्याची शिकार बिबट्याने केली तरी वन विभागाने त्वरित या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी दहिवडीचे उपसरपंच सचिन गारगोटे यांनी केली. या ठिकाणी बिबट्यांच्या पावलांचे ठसे व कुत्र्याची झालेली शिकार पाहण्यासाठी दहिवडीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये माजी आदर्श सरपंच संतोष दौंडकर माजी सरपंच आनंदराव गारगोटे ज्येष्ठ नागरिक किसन दौंडकर माजी चेअरमन मच्छिंद्र गारगोटे, विकास गारगोटे,कैलास गायकवाड, देविदास गारगोटे, अक्षय गारगोटे, सिद्धार्थ गारगोटे नरेंद्र गायकवाड, अनिकेत गारगोटे,राहुल लवांडे, धनंजय गायकवाड,अतुल गारगोटे, हर्षद गायकवाड, मयूर गायकवाड, अविनाश गारगोटे राजेश दौंडकर नवनाथ दौंडकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.