सुनील भंडारे पाटील
आज झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती अंतिम स्पर्धे मध्ये पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील शिवराज राक्षे याने महाराष्ट्र केसरी किताब मिळवला, त्याबद्दल शिवराज राक्षे याचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे,
पुण्यातील मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरीत संपन्न झालेल्या या स्पर्धेत उपविजेता महेंद्र गायकवाड याला शिवराज राक्षे यांनी काही क्षणात चितपट करून महाराष्ट्र केसरी हा बहुमान मिळवला, महाराष्ट्र केसरी साठी झालेले या अटीतटीच्या लढाईत दोन्ही पैलवान पुण्यातीलच असून कात्रज येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल या तालमीमध्ये हे दोन्ही पठ्ठे तयार झाले होते, काका पवार, गोविंद पवार या वस्तादच्या मार्गदर्शनाखाली राक्षे आणि गायकवाड या दोघांनी कुस्तीचे डावपेच शिकले होते,माती आणि गादी कुस्ती स्पर्धेत विजय मिळवत या दोघांनी अंतिम फेरी गाठली होती,
अखेर आज झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षे आणि महिंद्र गायकवाड या दोघात झालेल्या अटीतटीच्या लढाईत शिवराज राक्षे यांने महेंद्र गायकवाडला कुस्तीच्या मैदानात चितपट करून पाणी पाजले, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिवराज राक्षे याने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावल्याने सर्व थरातून कौतुक व अभिनंदनचा वर्षाव होत आहे,
पाच किलो चांदीची गदा, पाच लाख रुपये रोख, आणि एक महिंद्रा ठार गाडी असे सर्व पारितोषिके शिवराज राक्षेला देऊन सन्मानित करण्यात आले,