सुनील भंडारे पाटील
वढु खुर्द (तालुका हवेली) येथील एका 20 वर्षीय युवकाने गळफास घेऊन जीवन संपवल्याने परिसरात खळबळ उडाली असून कु. प्रतीक शिवाजी दरेकर वय 20 वर्ष असे या युवकाचे नाव आहे,
याबाबत पेरणे पोलीस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार आज रविवार दिनांक 19 रोजी दुपारी 12:00 वाजण्याच्या सुमारास प्रतीक दरेकर याने आपल्या स्वतःच्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, घटनास्थळी पेरणे पोलीस स्टेशनच्या वतीने पंचनामा करण्यात आला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून हॉस्पिटल पुणे येथे पाठवण्यात आला आहे, गावामध्ये वीस वर्षेय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, पुढील तपास पेरणे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक प्रशांत कर्णवर करीत आहेत,