छत्रपतींच्या चारीत्र्यातून मुलांनी काहीतरी शिकावे, घ्यावे : पत्रकार ज्ञानेश्वर मिडगुले - सणसवाडीत शिवजयंती उत्साहात

Bharari News
0
सणसवाडी प्रतिनिधी 
      जगभर मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होते ,आपण मोठ्या जोश्यामध्ये छत्रपतींचा जयजयकार करतो पण आपण त्याच्यातून काय घेतो हा खरा प्रश्न आहे . म्हणून मुलांनी छत्रपतींच्या चारित्र्यातून काहीतरी शिकावे , घ्यावे, असे विचार पत्रकार ज्ञानेश्वर मिडगुले यांनी शिव जयंती सणसवाडी येथील वसेवाडी प्रशालेच्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना मांडले,     
   गावातील अनेक मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पन केल्यानंतर शिवरायांचे आरतीने कार्यक्रमाला सुरुवात झाली १ ली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शिव चरित्रावर भाषणे झाली . शिवाजी महाराजां वर ' दैवत छत्रपती आमचे ' व इतर स्फुर्तीगिते ३री ते ८वी चे मुलींनी सादर केली . मिडगुले यांनी शिवाजींचाच सर्वत्र एवढा जयजयकार का होतो ते शूरवीर पराक्रमी राजे होते म्हणून  महा प्रतापी योद्धे होते म्हणून तर मग त्यांचे इतकेच शुर विरतर भारत भुमित अनेक राजे होऊन गेले . त्यांच्या जयंती का साजऱ्या होत नाहीत ?त्यांचा कुठे जयघोष का होत नाही ?त्याचे कारण त्यांचे राज्य हे सत्तेसाठी ऐश्वर्यासाठी स्वतःसाठी होतं आणि शिवरायांची राजवट समाजासाठी रयतेसाठी महिला जनसामान्यांवरील अन्याय रोकण्यासाठी होते . शिवरायांचा च जयघोष का , तर इतर मोगल, शाही राजवटीत देशमुख पाटील वतनदार हे शेतकर्‍यांकडून खूप जास्त २ -३ हजारावर शेतसारा बळजबरीने वसुल करायचे , पण शिवाजीची राजवट येता त्यांनी नाममात्र शे पन्नास रुपये घेण्यास सुरुवात केली . हे सगळ्या शेतकऱ्यांना जाणवलं की हा कर एवढा कमी कसा झाला ? त्यावेळेस त्यांना कळलं पहिली जुलमी राजवट गेली आणि शिवाजीचं राज्य आलय . याआधी सततच्या लढाया होत व स्वारीवर जाताना सैन्य घोडेस्वार शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून जाऊन पुरी नासाडी करीत . कुठे तळ असता आजू बाजूच्या गावपरीसरातील शेतमाल भाज्या फळे सैनीक ओरबाडीत , सारं नुकसान झालं तरी सैन्याला बोलायची सोय नव्हती पण शिवाजीने आपल्या सेनेला सक्त हुकूम केला होता की स्वारीवर जातांना बांध रस्त्यावरून जावे शेताची वा मालाची नासाडी करू नये आणी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये . हा फरक लोकांना जाणवला आणी ते शिवरायाचा जयजयकार करू लागले . पुर्वी रयतेच्या लेकीबाळी म्हणजे पाटील वतनदारांना त्याच्या बापाची जागीर वाटून महिलांची इज्जत लुटली जाई . पण रांजेगावचे बाबाजी पाटलाने शेतकर्‍याचे मुलीची अब्रु घेतल्याकारणे राजांनी त्याचे हात पाय छाटून चौरंग बनविल्याने लोकांना हायसे वाटून हा राजा व हे राज्यच आपले वाटू लागले आणि सारे छत्रपतीचा जयजयकार करू लागले .डोंगर दर्यात राहणारे आदिवासी  बेरड ,रामोशी , अडकरी अशा बऱ्याच जंगली लोकांचा त्यावेळी चोऱ्या लुटमार करणे हाच धंदा होता ,पण शिवरायांनी या सर्वांना आपल्या सेनेत नोकरी देऊन त्यांच्या पराक्रमाला वाव दिला त्यामुळे त्यांना रोजगारही मिळाला आणि दुसरीकडे गुन्हेगारी चोऱ्यामाऱ्या थांबल्या हे समाजाला जाणवले . म्हणून जयघोष ! मोगलाईत आपल्या बेगम मुमताजच्या स्मृती खातर ताजमहाल बांधणारा होऊन गेला बादशहा शहाजहान ! पेशवाईत कुणा मस्तानीच्या प्रेमापोटी राजमहाल बांधणारा होऊन गेला एक बाजीराव ! फक्त मराठेशाहीत म्हणूनमातेच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वराज्य निर्माण करून शेकडो गडकोट किल्ले उभारणारा एकच राजा -शिवाजी माझा ! म्हणून जयजयकार ! अगदी कठीण काळात बिकट परिस्थीतीत शिवरायांनी रयतेचं राज्य निर्माण केलं , आपल्याला फक्त आपल्या आईवडीलांची सुख स्वप्नं साकारायचीत . कुठं लढाया करायच्या नाहीत . जगावं कसं हे आम्हाला शिवरायांनी शिकवलं . तसं माणसा सारखं जगत शिकून सवरून चांगला माणूस व्हायचय , असे मिड्गुले यांनी सोदाहरण सांगितले,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!