गावडेवाडी प्रतिनिधी मिलिंद टेमकर
मंचर पोलीस स्टेशन हददीत मागील बरेच दिवसांपासून मोटार सायकल चोरीचे घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेने अंकीत गोयल पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, यांनी मोटार सायकल वाहन चोरी करणारी टोळी पकडण्याच्या सुचना दिल्याने,
सतिश होडगर पोलीस निरीक्षक, यांचे आदेशानुसार मंचर पोलीस स्टेशनचे डी बी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, पोलीस हवालदार संजय नाडेकर, पोलीस हवालदार राजेंद्र हिले, पो.कॉ. योगेश रोडे व पो. कॉ. दिनेश माताडे, असे मंचर शहरात पेट्रोलींग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत दोन ईसम विना नंबर प्लेटची मोटार सायकल घेवुन फिरत आहेत अशी माहीती मिळाली असता पोसई शेटे व पोलीस स्टाफ यांनी पिंपळगाव फाटा येथे विना नंबर प्लेटच्या मोटार सायकलवर दोन ईसम आले असता त्यांना थांबवुन त्यांचे वाहनाबाबत चौकशी केली असता त्यांचेकडे कोणतीही कागदपत्रे मिळुन आली नाहीत तसेच सदर वाहनाबाबत उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलीसांना त्यांचा संशय आला त्यामुळे पोलीसांनी सदर वाहनाचे चासीस नंबर वरून वाहनाचे तपशिल घेतले असता सदर वाहन हे मंचर पोलीस स्टेशन येथील चोरीचे गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे पोलीसांनी सदर ईसमांना ताब्यात घेवून त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव धनंजय उर्फ अमोल बाचकर रा. ढवळपुरी ता. पारनेर, जि. अहमदनगर व चॅटी उर्फ सुनिल सुरेश गावडे वय २० वर्षे रा.पिंपळगाव खडकी ता. आंबेगाव जि. पुणे असे सांगितले. त्यानंतर सदर ईसमास मा. न्यायालया समक्ष हजर केले असता मा.न्यायालयाने त्याना ०२ दिवस पोलीस कोठडी दिली असुन सदर आरोपीकडे मोटार सायकल चोरीच्या अनुशंगाने चौकशी केली असता त्याने अशाच प्रकारच्या अनेक माटार सायकल चोरी केल्याचे सांगुन त्याने हिरो प्लेंडर व ईतर कंपनीच्या एकुण १३ मोटार सायकल काढुन दिल्या आहेत. सदर वाहनांची माहीती घेतली असता त्यापैकी ८ वाहनांचे मालकांचा शोध लागलेला असुन निष्पन्न ८ वाहनांबाबत मंचर, रांजणगाव MIDC व महाळुंगे MIDC या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. तसेच उर्वरीत ५ मोटार सायकलचे मालकांचा शोध लागलेला नसुन त्याबाबत चौकशी चालु आहे. सदर ५ मोटार सायकल वाहनांचे बाबत माहीती प्राप्त करून पुढील कारवाई करत आहोत. सदर आरोपींकडे चौकशी करून पुढील तपास पोसई शेटे, पो. हवा. हिले, पो. हवा. नाडेकर हे करत आहेत.
सदर कामगिरी अंकीत गोयल, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मितेश गट्टे, अप्पर पोलीस अधिक्षक सी, पुणे ग्रामीण, सुदर्शन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग खेड पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सतिश होडगर पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस उप निरीक्षक सोमशेखर शेटे, पोलीस हवालदार राजेंद्र हिले, पोलीस हवालदार संजय नाडेकर, पोलीस हवालदार तानाजी हगवणे, पोलीस हवालदार राजेश नलावडे, पोलीस नाईक सोमनाथ वाफगावकर, पोलीस अंमलदार योगेश रोडे, पोलीस अंमलदार दिनेश माताडे, पोलीस अंमलदार अजित पवार यांनी सदरची कारवाई पार पाडुन सदरचे मोटार सायकल हस्तगत केलेल्या आहेत.