सुनील भंडारे पाटील
पेरणे (तालुका हवेली) येथील जयस्तंभ झोपडपट्टी मधील घरांच्या नोंदी करण्यासाठी ग्रामस्थांची अनेक दिवसांची मागणी होती, नुकत्याच नव नियुक्त झालेल्या सरपंच उषा वाळके यांनी धडाकेबाज कामगिरी करत गोरगरिबांना हक्काचे घर मिळून दिले आहे,
पेरणे ग्रामपंचायतच्या ऐन निवडणुकीच्या काळात वार्ड नंबर 4 मधील जयस्तंभ झोपडपट्टीतील नागरिकांनी आंदोलनाचे शस्त्र छेडले होते, यासंबंधीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना व संबंधितांना देखील देण्यात आल्या होत्या, संबंधित ठिकाणी घराच्या नोंदी करण्यासाठी ग्रामपंचायत ने समझोता पत्र काढून आंदोलन तात्पुरत्या काळासाठी थांबवले होते, निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर नवनियुक्त सरपंच उषा वाळके यांनी तातडीने झोपडपट्टीतील रहिवाशांचे काम हाती घेतले, गेल्या आठवड्यापासून जयस्तंभ झोपडपट्टी येथील जिल्हाधिकारी नावावर असणारा गट सरकारी खानपड येथे स्थित असलेल्या अनधिकृत झोपडपट्टीतील घरांची नोंद, मोजणी सरपंच उषा वाळके, ग्रामविकास अधिकारी कानिफनाथ थोरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली,
शासन व ग्रामपंचायत यांच्या या निर्णयामुळे संबंधित ठिकाणी असणारी अनधिकृत घरे आता अधिकृत होणार असून त्यांना सर्व शासकीय सोयी सुविधा मिळणार आहेत, तसेच येथील घरांची देखील मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे, गरीब नागरिकांचा ग्रामपंचायत 8 अ उतारा तयार झाल्यामुळे लोकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे, याप्रसंगी माजी उपअध्यक्ष तंटामुक्ती दशरथ वाळके, मा ग्रा स साईनाथ दादा वाळके, ग्रामपंचायत सर्व कर्मचारी वृंद, व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते,