टाकळी हाजी प्रतिनिधी
पारनेर (जि.नगर) येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या विद्यालयातील कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे सर यांनी रंगीत खडूच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आकर्षक चित्र निर्मिती केली आहे .
यानिमित्त त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व प्रतापगडाचे रचना चित्रण करत गड किल्ले संवर्धनाचा संदेश दिला आहे. फलक चित्राचे पारनेर शिरूर तालुक्यातून खूप मोठे कौतुक होत आहे . सोशल मीडियातून खूप मोठ्या प्रमाणात चित्र व्हायरल झाले असून जवळपास हजारो व्यक्तींच्या स्टेटसला शिवजयंती निमित्त रेखाटलेले आकर्षक फलक दिसून येत आहे . सातत्याने अशा प्रकारे दिनविशेष चे फलक द्वारे प्रबोधनपर चित्र निर्मिती कवडे सर करत असतात.
अशा या अवलिया कला शिक्षकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे ,सचिव जी डी खानदेशे ,पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे ,जिल्हा कला शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पठाडे तसेच विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब करंजुले,उपप्राचार्य संजय कुसकर,पर्यवेक्षक अंकुश अवघडे तालुका व जिल्ह्यातून सर्व शिक्षक बंधू भगिनी पालक विद्यार्थी यांनी कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे सर यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.
पारनेर तालुक्यातील पाबळ येथील कवडे मळ्यातील कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे हे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेत त्यांच्या या कलेमुळे प्रसिध्दी झोतात आले आहेत.