सुनील भंडारे पाटील
धर्मपीठ, शक्तिपीठ, बलिदानपीठ, प्रेरणापीठ श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (तालुका शिरूर) श्रीक्षेत्र तुळापूर (तालुका हवेली) येथील अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळी, श्रीमंतयोगी छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी, जाणता राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण राज्यात तसेच संपूर्ण हिंदुस्तान मध्ये आज 19 फेब्रुवारी रोजी सर्व शहरे, ग्रामीण भाग, ऐतिहासिक,धार्मिक स्थळे, त्याचप्रमाणे गड किल्ल्यावर मोठ्या उत्साहात साजरी होत असताना दिसत आहे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला या ठिकाणी देखील राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली,
स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळावर देखील राज्यातील, तसेच देशातील काना कोपऱ्यामधून शक्तीज्योतीचे आगमन तसेच प्रस्थान मोठ्या उत्साहात झाले आज सकाळी पहाटे 3:00 पासून ढोल ताशा पथकाचा निनाद, धर्मवीर शंभूराजे की जय, जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, फटाक्यांची आतषबाजी, याने परिसर दणाणून गेला, दुचाकी गाड्या चार चाकी गाड्या तसेच सायकलला भगवा झेंडा बांधून सर्वांची दाट वर्दळ असल्याने सर्वत्र वातावरण भगवेमय झाले होते,
नुकताच राज्य शासनाने धर्मवीर शंभूराजे समाधीस्थळाचा नवीन आराखडा व निधी मंजूर केल्याने तसेच राजकारण्यांच्या वीर पुरुषांच्या बद्दल डिवचन्याने त्याचप्रमाणे राज्य शासन केंद्र शासन यांच्या हिंदुत्वादी धोरणामुळे हिंदू धर्मातील लोकांना चांगलीच एनर्जी मिळाली आहे, त्यामुळे तारखेनुसार का असेना परंतु दरवर्षीपेक्षा यावर्षी शिवजयंती चा कार्यक्रम जोरदार झाला, तरुण आबाल वृद्ध महिला यांचा सहभाग उस्फुर्त होता, यातील बऱ्याच जणांनी पारंपारिक पेहराव धारण केला होता,