सुनील भंडारे पाटील
आज दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघोली येथे रोटरी क्लब हिल साईड यांच्यावतीने RYLA या उपक्रमा अंतर्गत करिअर मार्गदर्शन पर एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेत विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात रोटरी क्लब हिलसाईडच्या अध्यक्ष विभावरी देशपांडे यांनी केली या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात अश्विनी शिलेदार यांनी फॉरेन लैंग्वेज मधील करिअरच्या विविध संधी यावर मार्गदर्शन केले यानंतर मेजर जनरल विजय पिंगळे यांनी संरक्षण क्षेत्रातील करिअरच्या संधी यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मेजर जनरल विजय पिंगळे यांनी मार्गदर्शन करताना त्यांच्या कारकिर्दीतील विविध प्रसंग विद्यार्थ्यांसोबत शेअर केले यावेळी त्यांनी दोन अतिरेक्यांना मारतानाचा अनुभव विद्यार्थ्यांसोबत शेअर केला या कार्यक्रमात यान करियर सोल्युशनच्या फाउंडर व रोटरी क्लब हिलसाइड च्या युथ डिरेक्टर स्मिता विखणकर यांनी सोशल मीडिया मधील करिअरच्या संधी यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच रौनक गिरी व तन्वी गिरी यांनी एज्युकेशन अँड करियर अब्रोड याबाबत विद्यार्थ्यांना विविध संधी यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब हिल्साइड च्या सेक्रेटरी पूजा गिरी तसेच रोटरी क्लबचे विनोद देशपांडे व संजय डोळे तसेच नीता पिंगळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी यांनी मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राणी तोरडमल मॅडम यांनी केले कार्यक्रमासाठी प्रा. प्रज्ञा चासकर व प्रा. कीर्ती ढमाले यांनी विशेष श्रम घेतले