सुनील भंडारे पाटील
नागरी सुविधा केंद्र निगडी, पुणे येथील डाटा एन्ट्री ऑपरेटर 4000 ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी रंगे हात पकडले,
निगडी पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 अन्वये आरोपी लोकसेवक शैलेश अकांबरी बासुतकर वय 41 पद डाटा एन्ट्री ऑपरेटर नागरी सुविधा केंद्र निगडी अप्पर तहसील कार्यालय पिंपरी चिंचवड अंतर्गत पुणे, याला 4 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी रंगेहात पकडले, याबाबत एका महिला तक्रारदाराने त्यांच्या दोन लहान बहिणींचा जातीचा दाखला काढण्यासाठी नागरी सुविधा केंद्र मध्ये अर्ज दाखल केला होता, दाखला देण्यासाठी डाटा एन्ट्री ऑपरेटर शैलेश बासुतकर यानी लाच मागणी केल्याची तक्रार लाचलुचकत प्रतिबंधक विभाग पुणे, यांना प्राप्त झाली होती, सदर तक्रारीची पडताळणी केली असता शैलेश बासुतकर यानी तक्रारदार याच्याकडे 4 हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारताना त्यास रंगे हात ताब्यात घेण्यात आले,
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने केला,