शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
निमोणे (ता . शिरूर) येथील - मोटेवाडी मध्ये आपल्या मुलीकडे काही दिवसांपुर्वी वास्तव्यास आलेले मनोहर चंदरराव शितोळे रा . सांगवी सांडस , ता . हवेली , जि . पुणे यांचा निमोणे - मोटेवाडी रोडलगत अज्ञात इसमाने त्यांच्या चेहऱ्यावर , कमरेवर , पाठीवर , गुप्तांगावर ठिकठिकाणी मारहाण करून त्यांना गंभीर जखमी करून त्यांचा निर्घृनपणे खुन केला आहे.
त्याबाबत त्यांचा मुलगा राजाराम मनोहर शितोळे रा . सांगवी सांडस , ता . हवेली , जि . पुणे यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये रितसर फिर्याद दाखल केली आहे . याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि ०२ फेब्रुवारी रोजी ०८ वाजण्यापासून ते दि . ०४ फेब्रुवारी रोजी दुपारी ०१ वा वाजण्याच्या सुमारास मौजे निमोणे येथील निमोणे -मोटेवाडी रोडलगत नानासाहेब कुंडलिक काळे यांच्या शेतजमीन गट नं ६१९ मधील ऊसाच्या शेतामध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून फिर्यादीचे वडील मनोहर चंदरराव शितोळे ( वय -७१ वर्षे ) रा.सांगली सांडस , ता . हवेली , जि . पुणे यांच्या चेहऱ्यावर , कमरेवर , पाठीवर , गुप्तांगावर ठिकठिकाणी मारहाण करून त्यांना गंभीर जखमी करून त्यांचा खुन केला आहे .हा खुण कुणी व कशासाठी केला याचा शोध शिरूर पोलिस घेत असून या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप यादव हे करत आहे . शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गेल्या महीन्यात उरळगाव येथे महिलेचे अर्धवट जळालेले प्रेत सापडले होते . त्या महीलेची अद्याप ओळख पटली नसून या खुणाच्या गुन्हयासह या दोन गुन्हयांची उकल होणे शिरुर पोलिसांपुढे आव्हाण बनले आहे .