पेरणे फाट्यावरील झोपडपट्टी लोकवस्ती समस्यांच्या विळख्यात - ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष;आरोग्य धोक्यात येत असल्याने नागरिकांमध्ये संताप

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील 
                 पेरणे फाटा (ता.हवेली) येथील कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ जवळ असलेल्या तसेच पुणे-नगर महामार्ग व भीमा नदी किनाऱ्याजवळ असलेल्या पेरणे फाटा  झोपडपट्टी लोकवस्तीमध्ये सांडपाणी,कचऱ्याचे ढीग,वापरण्यासाठी पाणी,रस्त्यावर साचलेला कचरा,लोकवस्तीत पसरत असलेली दुर्गंधी,आदी विविध समस्यांमुळे पेरणे फाट्यावरील झोपडपट्टी लोकवस्ती समस्यांच्या विळख्यात सापडली आहे.या समस्या सोडविण्याकडे प्रत्यक्षात मात्र पेरणे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.यामुळे लोकवस्तीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तसेच या विविध समस्यांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरत असल्याचे माहिती देताना महाराष्ट्र राज्य लहुजी शक्ती सेनेच्या महिला हवेली तालुकाध्यक्षा सारिका काळे यांनी सांगितले,     
  सद्यस्थितीत पेरणे फाट्यावरील झोपडपट्टी लोकवस्तीत सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.लोकवस्तीच्या पाठीमागे असलेल्या भीमा नदीच्या बाजूला कचऱ्याचे ढीगच्या,ढिगारे दिसतात.यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून,त्यांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे.साचलेल्या या कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.तसेच साचलेल्या कचऱ्याच्या ठिकाणी पाळीव जनावरे फिरून तो कचरा खात असल्याने पाळीव जंनवारांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.याकडे मात्र पेरणे ग्रामपंचायत  लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे.       
 पेरणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत ऐतिहासिक विजयस्तंभच्या समोरच्या बाजूलाच अनेक वर्षांपासून ही झोपडपट्टी लोकवस्ती असून सर्व जाती धर्मातील अनेक कुटुंब व मोठ्या प्रमाणात मतदार येथे राहातात.गावातील विविध भागातील येथे कचरा आणून कचऱ्याचे ढीग लागल्याचे दिसत आहेत.सांडपाण्याचे व्यवस्थापन नाही त्यामुळे ठिकठिकाणी घाण पसरली आहे.सांडपाणी रस्त्यावर पसरत आहे.स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने परिसराची दुरवस्था होत आहे.कचरा वाहतुकीसाठी निट रस्ता नाही पण ग्रामपंचायत गांभिर्याने घेत नाही गेल्या काही दिवसांपासून गावातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.विशेष म्हणजे १२ दिवस पाण्याचा पुरवठा बंद आहे.    
  याबाबत पेरणे ग्रामपंचायतीच्या सरपंच उषा दशरथ वाळके व ग्रामविकास अधिकारी कानिफनाथ थोरात यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की झोपडपट्टी अनधिकृत आहे ग्रामपंचायतीला कोणत्याच घराची नोंद नाही, तरीदेखील आम्ही सोयी सुविधा देत असून, कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी प्रयत्न चालू आहेत,

[निवडणुकीच्या काळात फक्त मते मागायला येतात मात्र नंतर आमच्या लोकवस्तीत काय समस्या आहेत हे विचारण्यासाठी किंवा पाहण्यासाठी नंतर कोणी फिरकत पण नाय.मात्र स्वच्छतेचा प्रश्न मोठा गंभीर होत असताना कोणीही पुढे येत नाही.सांडपाणी व्यवस्थापन काम अर्धवट आहे,कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे,पाण्याचा प्रश्न समोर उभा आहे,असे अनेक नागरी प्रश्न आमच्या लोकवस्तीत पुढे दिसत आहे.ते त्वरित लक्ष घालून ग्रामपंचायतीने सोडवावेत ही मागणी करीत आहे.
           --सारिका काळे,तालुकाध्यक्षा,लहुजी शक्ती सेना महिला विभाग तथा रहिवासी]

[पेरणे फाटा झोपडपट्टी लोकवस्तीत असलेल्या समस्या ग्रामपंचायतीमध्ये येत्या ७ फेब्रुवारीच्या मीटिंगमध्ये घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.तसेच कचरा प्लांट टाकण्याच्या दृष्टीने कामकाज चालू आहे.याबाबत सरपंच उषा वाळके यांच्याशी चर्चा झाली आहे.
       -- अशोक कदम,उपसरपंच - ग्रामपंचायत पेरणे]
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!