सुनील भंडारे पाटील
वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथील भीमा नदी तीरावरून आज मध्य रात्री चोरट्यांनी डल्ला मारून तीन शेतकऱ्यांचे शेती पंप चोरून नेले, गेल्या आठवड्यात देखील तीन शेतकऱ्यांचे शेती पंप चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे,
भीमा नदीच्या काठावर या भागामध्ये वढु बुद्रुक तसेच वाजे वाडीच्या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात बागायत क्षेत्र असून भीमा नदी मधून लिफ्टच्या साह्याने शेतीसाठी दोन-तीन किलोमीटर पर्यंत पाणीपुरवठा केला जात आहे, यासाठी लागणारे उच्च दाबाचे शेती पंप बसवण्यात आलेली असून, एका शेतीपंपाची किंमत 30 हजाराच्या पुढे आहे,
या भागात सोकावलेल्या चोरट्यांनी शेती पंप चोरून नेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, शेती पिकासाठी कमी बाजार भाव, वाढता उत्पादन खर्च यामुळे आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे, त्यात आता हे नवीन संकट, या भागामध्ये शेतीपंप, विद्युत रोहित्र चोरीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत, पोलीस खात्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे अशी व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे,