मलकापूर बुलढाणा येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात

Bharari News
0
मलकापूर बुलढाणा प्रतिनिधी अमर तायडे 
            19 फेब्रुवारी 2023 छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळा आई तुळजाभवानी फाउंडेशन मलकापूरच्या वतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो या वर्षी देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला,     
त्या अनुषंगाने मलकापूरचे डॉ.अमरकुमार आनंद तायडे हे विविध समाज उपयोगी कार्य करत असतात तसेच भारतीय संविधान जनजागृती अभियान अंतर्गत तरुण पिढीला एक नवीन दिशा देण्याचे मोलाचे कार्य करत आहेत व त्याचे सामाजिक क्षेत्रातात त्यांचेउल्लेखनीय योगदान आहे, त्यांना देशातील विविध पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. ते करत असलेले कार्य इतरांना
दिशादर्शक ठरत आहे म्हणून आई तुळजाभवानी फाउंडेशन च्या वतीने विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चैनसुख संचेती यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरव करण्यात आला.त्यावेळी द पीपल्स बहुउद्देशीय संस्थेचे करण विनोद झनके, चंदू पवार, शुभम सावळे, आशिष पवार, पूजा पवार उपस्थित होते. यावेळी विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली, शहरांमधून मिरवणूक  काढण्यात आली होती, तसेच उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी मार्गदर्शन केले,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!