सुनील भंडारे पाटील
आपल्या भारत देशाची राजधानी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर दिवान ए आम मध्ये शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते , या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते, यावेळी त्यांनी आपल्या भाषणामधून जाहीर केले की इथून पुढे दरवर्षी मोठी शिवजयंती लाल किल्ल्यावर साजरी करण्यात येणार आहे,
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयाचे आणि घोषणेचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून, छत्रपतींचे कार्य कोणालाच विसरता येणार नाही, त्यांचे मॅनेजमेंट काय होते ते गड किल्ल्यावर गेल्यावर कळते, छत्रपती शिवाजी महाराज ही एक दैवी शक्ती आहे, त्याकाळी काय परिस्थिती असेल हा एक विचार करूनही अंगावर काटा येतो, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी केली जात आहे, यापुढे दरवर्षी शिवजयंती लाल किल्ल्यावर साजरी केली जाईल, ज्या लाल किल्ल्यामध्ये औरंगजेबाणे छत्रपती शिवरायांचा अपमान करून नजर कैदेत टाकले होते, ज्या दिवाण-ए खास मध्ये शिवछत्रपतीना बोलावून त्यांचा अपमान करण्यात आला होता, त्या ठिकाणी शिवजयंतीचा सोहळा साजरा होणे, हा माझ्या आयुष्यातील रोमांचकारी क्षण आहे, आज बदला घेण्याची संधी मिळाली, अनेक शिवभक्त या ठिकाणी आले असून, ही शिवजयंती सोनेरी अक्षरात लिहिली जाईल, असे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले,या कार्यक्रमाचे आयोजन अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर आर पाटील फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले होते,