सुनील भंडारे पाटील
गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाला अखेर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले असून, केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे, आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाणचिन्ह मिळाले आहे,
शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे उद्धवजी ठाकरे गट तसेच शिंदे गट वेगळे झाले होते, त्यामुळे राज्यातील महा विकास आघाडी सरकार कोसळले होते, शिंदे गटाने राज्यात भाजपच्या गळ्यात हात घालून राज्यात सरकार स्थापन केले, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नाव तसेच धनुष्यबाण हे चिन्ह दोन्ही गटां पैकी कोणाकडे हा वाद चांगलाच पेटला होता, दोन्ही गटांची रस्सीखेच पाहता केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला शिवसेना नाव व धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मनाई केली होती, मध्यंतरी च्या काळात नाव व चिन्ह कोणाला मिळणार, की नाव व चिन्ह गोठवले जाणार याबाबत राज्यांमध्ये नागरिकांमध्ये चर्चेचे चांगलेच वादळ उठले होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार बरोबर घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर दोन्ही गटांनी नाव आणि चिन्ह यासाठी दावा एकमेकांवर दाखल केला होता, निवडणूक आयोगासमोरील चाललेल्या दोन्ही गटाच्या अटीतटी च्या लढाईत, केंद्रीय निवडणूक आयोगाने आज मोठा निर्णय घेतला, केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच याबाबत निकाल जाहीर केला असून, यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे, शिवसेना हे नाव तसेच धनुष्यबाणचिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळाले असून, शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे नवजीवन संजीवनी मिळाली आहे, तसेच राज्यातील डबल इंजिन सरकारला चांगलीच ताकद यामुळे मिळणार आहे,