सुनील भंडारे पाटील
श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजीनियरिंग लोणीकंद (तालुका हवेली) मध्ये दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला.
सदर प्लेसमेंट ड्राईव्ह हा रेडियंट आयटी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या कंपनीसाठी घेण्यात आला होता .प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मारुती बाप्पु भुमकर, तसेच रामचंद्र कॉलेज ऑफ इंजीनियरिंग चे प्राचार्य प्रा. डॉ.अविनाश देसाई यांनी अभिनंदन केले.या प्लेसमेंट ड्राईव्हसाठी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख प्रा. शुभ्रा माथुर, प्रा. कोमल यादव, प्रा.नीलम मॅडम आणि इतर सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.