सुनील भंडारे पाटील
लोणीकंद (तालुका हवेली) पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत परिसरात अग्नि शस्त्र बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अत्यंत शिथाफीने पकडून गजाआड करण्यात आले,
याबाबत लोणीकंद पोलीस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार पुणे शहर तपास पथकाचे अधिकारी, अंमलदार तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने गुन्हेगार विशाल उर्फ ईशाप्पा जगन्नाथ पंदि वय 21 वर्ष ( राहणार बकोरी रोड पुणे) याला अटक करण्यात आली असून, अवैध धंद्यावर कारवाई करणे कामी तसेच गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस नाईक स्वप्नील जाधव यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पोलीस रेकॉर्डवर सराईत गुन्हेगार पंदि हा बकोरी रोडवरील न्याती ॲलन या बाजूला लेबर कॅम्प समोर उभा असून त्याच्याजवळ पिस्तूल आहे, तातडीने त्या ठिकाणी तपास पथकाचे अधिकारी जाऊन पंदि याला ताब्यात घेण्यात आले, त्याची झडती घेतली असता 34 हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल व 2 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले,
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त रंजन शर्मा, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकाटे, स्वप्निल जाधव, विनायक साळवे, कैलास साळुंखे, अजित फरांदे, सागर जगताप, अमोल ढोणे, आशिष लोहार,मल्हारी सपुरे, सचिन चव्हाण यांनी केली आहे,