सुनिल भंडारे पाटील
माणूस जिवणामध्ये दोन प्रकारे मोठा व यशस्वी होवू शकतो, एक शिकून व दुसरे सवरून ! शिकून सवरून ! शिकून म्हणजे शिक्षणाने व सवरून म्हणजे सवरून, सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्दयत - सत्य , संयम, सदाचार , सुविचार , संताचे विचार अंगिकारूनच संस्कार मिळतात . जिवनात शिक्षणा बरोबर श्रमाची व संस्काराची गरज आहे , असे विचार हभप ज्ञानेश्वर मिडगुले यांनी चिंचोशी तालुका खेड 'येथील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिरात श्रीमती सी के गोयल कला व वाणिज्य महाविद्यालय दापोडी पुणे व चिंचोशीचे विद्यार्थ्यांसमोर बोलताना मांडले.
दिनांक २६ फेब्रुवारी रोजी आमदार दिलीप मोहिते , जिल्हाध्यक्ष निर्मलाताई पानसरे व जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पोपटराव देवकर , सचिव सुभाष राव गारगोटे, मुख्याध्यापक नामदेव नंदकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होऊन आठ दिवसांमध्ये समाज प्रबोधन अभियान ,महिला सक्षमीकरण, अक्षय ऊर्जा जनजागृती ,आरोग्य जागृती ,जलसंधारण ,ग्राम स्वच्छता , पर्यावरण जागृती , वृक्षारोपण ,ग्राम सर्वेक्षण , व्यक्तिमत्व विकास , निर्मलग्राम , श्रमदान, खेळ , मनोरंजन आदी सकाळी ६पासून सायं १० पर्यंत भरगच्च वेळापत्रकाप्रमाणे शिबीरार्थी विद्यार्थ्यांची दिनचर्या होती . शिवाय सांस्कृती कार्यक्रम व रोज ३ते ५ प्रबोधनात्मक व्याख्यान आदी कार्यक्रमाचे आयोजन होते . प्राचार्य डॉ सुभाष सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली प्रा . डॉ बाळासाहेब माशेरे, प्रा. दिपाली खर्डे ,प्रा . परबतराव बैसाणे ,प्रा .सिद्धार्थ कांबळे , प्रा . वैभव डावखर ,प्रा .प्रितिश पठारे , प्रा . महेंद्र शिंदे आदींनी कार्यक्रम अधिकारी व कु . रोहित गोडबोले , कु .मंदार गावडे , कु . प्रीती बिराजदार, कपील कांबळे , कु . रत्नप्रभा मोरे , कु . काजल काटेआदी विद्यार्थी प्रतिनिधींनी योगदान दिले . सरपंच उज्वला गोकुळे व ग्रामस्थांनी मान्यवर व शिबीरार्थींचे स्वागत करून चिंचोशिचे सर्व मंडळे व सर्व पदाधीकारी , ग्रामस्थ, महिला व नागरीकांनी या विशेष श्रम संस्कार शिबीरास सहयोग करत भाग घेतला. प्रा . बैसाने यांनी प्रास्तावीक केले पत्रकार मिडगुले यांचा सत्कार करत प्रा बाळासो माशेरे यांनी आभार मानले . शिबिरामध्ये मा . संपतराव गारगोटे, प्रा . सुधाकर बैसाणे, प्रा. प्रविण कड , कवयित्री अस्मिता चांदणे , एपीआय मच्छिंद्र गोरडे व पत्रकार ज्ञानेश्वर मिडगुले याची विद्यार्थी व समाज प्रबोधनात्मक व्याखाने झाली . हायस्कुल व जिल्हा परीषद शाळेच्या मुलांचे रात्री ७ ते १० दर्जेदार कार्यक्रम पार पडले . समारोपात सर्व मान्यवरांचा व शिबीर यशस्वी करणाऱ्या संयोजकांचा चिंचोशी ग्रामस्थांनी सन्मान करत आभार मानले .