रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
रांजणगाव गणपती (ता शिरूर) येथील महागणपती मंदिरामध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कर्मचारी महिलांचा यथोचित असा सन्मान करण्यात आला असल्याची माहिती रांजणगाव देवस्थान ट्रस्ट च्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील यांनी दिली.
रांजणगाव महागणपती देवस्थान मंदिर परिसरातील साफसफाई व इतर सेवाकामे गेल्या अनेक वर्षांपासून करत असलेल्या रांजणगाव देवस्थानच्या महिला कामगारांचा प्रथमच महिला दिनाच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला.
श्री क्षेत्र रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त अध्यक्षा स्वाती दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांच्या संकल्पनेतील दुसरी महाआरती आणि त्या महाआरतीचे मानकरी म्हणून देवस्थान मधील सर्व सेवेकरी महिला यांच्या हस्ते सकाळी ७:३० वाजता महाआरती करण्यात आली. तसेच या सर्व महिलांना त्यांच्या सेवेबद्दल शाल, श्रीफळ आणि साडीचोळी देऊन गौरवण्यात आले. तसेच कारेगाव च्या ग्रामपंचायत . सदस्या प्रियंका गवारे यांचा देखील सन्मान करण्यात आला
या प्रसंगी देवस्थान ट्रस्ट च्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर , मुख्य विश्वस्त ओमकार देव, उपाध्यक्ष संदीप दौडकर,. सरस्वती पाचुंदकर पाटील, पोलिस पाटील.सारिका पाचुंदकर पाटील, कारेगाव ग्रां. स प्रियांका गवारे, विभा देव, सुमनताई हगवणे, अनिता वाळके,. वर्षा पाचुंदकर पाटील, रुपाली देव, श्रुती हगवणे, मेघना गवारे, . किरण पिंगळे, सेवेकरी, माता-भगिनी, भाविक भक्त उपस्थित होते.