सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथे दीड महिन्यापूर्वी झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला कर्नाटक मध्ये जाऊन शिक्रापूर पोलिसांनी केले गजाआड, अनेक दिवसांच्या प्रयत्नांना यश,
दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी सकाळी 6:00 वाजता, कोरेगाव भीमा येथील तुळजाभवानी नगर येथे रफिक अब्दुल पठाण यांचे बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर सुशांत अनिल करकरमर वय 46 वर्ष याचा धारदार शस्त्राने खून झाला होता, सदर खुनाच्या घटनेबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता, सदर गुन्ह्याचा आरोपी फरार होता, तपासामध्ये गुन्हा घडले ठिकाणचे आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासून तसेच साक्षीदार यांना विश्वासात घेऊन, आरोपी प्रदीप बलराम गराई राहणार पांचाल, तालुका सोनमुखी, जिल्हा वाकोडा, पश्चिम बंगाल याला ताब्यात घेतले असून मयत इसम हा आरोपीचे पत्नीचा पहिला पती आहे, आरोपीने त्याचे पत्नीचे मयत इसम सोबत चारित्र्याचा संशय घेऊन सुशांत याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे,
सदर आरोपी हा गुन्हा घडले पासून सुमारे दीड महिना फरार होता, त्याची माहिती काढली असता तो पोलिसांना वारंवार गुंगारा देण्याच्या हेतूने ओरिसा, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, चेन्नई, बेंगलोर, कर्नाटक अशा ठिकाणी येजा करीत होता, त्याचे सतत ठिकाण बदलन्याने आरोपी सापडत नव्हता, वेगवेगळ्या पोलीस शोध पथकांच्या माध्यमातून शोध मोहीम चालू होती, आरोपी प्रदीप गराई बेंगलोर येथे असल्याची माहिती मिळताच तात्काळ शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने शोध पथक रवाना झाले, तसेच सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले,
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस हवालदार अमोल दांडगे, पोलीस कॉन्स्टेबल नीरज पिसाळ, पोलीस नाईक शिवाजी चितारे यांनी केली,