सुनील भंडारे पाटील
वढु बुद्रुक (तालुका शिरूर) आणि परिसरातील गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली, अवकाळी आलेल्या पावसाने शेती पिकाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले,
हवामान खात्याचा अंदाजानुसार 15 16 आणि 17 या तारखेला तीन दिवसांमध्ये राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती,आज पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, अचानक आलेल्या या अवकाळी पावसाने गहू हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून, हाताशी आलेले पीक पावसाच्या झोडपण्याने जाणार आहे, अचानक आलेल्या पावसाने शिमग्याचा फड शिंपला अशा स्वरूपाची चर्चा सध्या जुन्या वयस्कर शेतकऱ्यांमध्ये चालू आहे, जोरदार वाऱ्यासह या भागात वादळ निर्माण झाले होते, आळंदीच्या बाजूने काळे कुट्ट झालेले आभाळ आणि त्याच बाजूने पावसाचे जोरदार आगमन झाले, काल रात्री उशिरा तसेच आज सकाळी अनेक ठिकाणी पाऊस झाल्याचे निदर्शनास आले, तसेच पुणे जिल्ह्याचा अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली,