सुनील भंडारे पाटील
जगाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्याची सतत हेळसांड होत असून, पिकवलेला शेतमाल माती मोल बाजारभावाने विकला जात असल्याने, शेतकऱ्यांच्या कष्टाची,घामाची माती होत आहे, शेतकऱ्यांचा विचार करणारा कोणीच वाली नाही,
सद्यस्थितीत पाहता माणसाला जगण्यासाठी अन्नधान्य, भाजीपाला, दूध, किराणा पिकवणारा फक्त शेतकरी आहे, अर्थव्यवस्थेत उत्पादन व्यवस्थेत जीवनावश्यक शेतीमाल वगळता सर्वच वस्तूंच्या किमती चारपट वाढल्या आहेत, उत्पादन खर्चाच्या किमतीत मात्र वाढ होऊन देखील शेतीमालाच्या किमती एवढ्या ढासळल्यात की, उत्पादन खर्च तर सोडाच शेतमाल काढून बाजारात विकण्यासाठी चा मजुरीचा खर्च देखील भागत नाही, शेतीमाल पिकवण्यासाठी लागणारा कालावधी, जमिनीची मशागत, बी बियाणे, खते, औषधे, याच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत, त्याचप्रमाणे शेतकऱ्याचे कष्ट याचा विचार केला असता, शेतकऱ्याची सर्वच बाजूणे कोंडी झाली आहे, उत्पादित माल नाईलाजास्तव मातीमोल किमतीने बाजारात विकला जातो, एकंदरीत होणारा खर्च, आणि उत्पादन याचा ताळमेळ न बसल्याने, शेतकऱ्याला कुटुंबाचे पालन पोषण, मुलांचे शिक्षण करणे देखील मुश्किल झाले आहे, जगाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांची मात्र कायम हेळसांड होताना दिसत आहे, राज्य शासन व केंद्र शासन यांनी आता शेतमालाला हमीभाव देण्याची गरज आहे,