सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) आणि परिसरातील शेतकरी व नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी तसेच आकर्षक सुविधांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरांमधील उच्चस्तरीय बँकांचे शाखा उघडण्यात येण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे,
मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्र, तसेच आसपासच्या परिसरात असणारे औद्योगीकरण, वाढत चाललेली रहदारी यामुळे या भागात आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, नागरिकांना व्यवहार पूर्ण करण्यासाठी तसेच आर्थिक उलाढालीसाठी उत्कृष्ट दर्जाची एटीएम सेवा, धनादेशाचे व्यवहार, कर्ज मागणी, कर्ज फेड, बँकांच्या इतर उत्कृष्ट सेवा सुविधा मिळण्यासाठी उच्च प्रतीच्या आंतरराष्ट्रीय बँका यांनी या ठिकाणी आपल्या शाखा उघडाव्यात असे मत लोकांनी व्यक्त केले आहे, कोरेगाव भीमा परिसरामध्ये दिवसेंदिवस आर्थिक उलाढाल वाढत चालली असून, बऱ्याचदा लोकांना आर्थिक फसवणुकीला देखील सामोरे जावे लागते, परिसरात वडू बुद्रुक,आपटी, वाजेवाडी, पिंपळे जगताप, सणसवाडी, डिंग्रजवाडी, त्याचप्रमाणे हवेलीच्या पूर्वेपट्ट्यातील अनेक गावे या भागात शेतीचे मोठे क्षेत्र आहे, बागायतदार शेतकरी, उद्योजक, व्यापारी, नोकरदार वर्ग, यांना बँकिंग क्षेत्रातील उच्च दर्जाच्या सोयी सुविधा मिळण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरातील आयसीआयसीआय, एचडीएफसी, ॲक्सिस सारख्या बँकांनी शाखा उघडाव्यात अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे,