सुनील भंडारे पाटील
फुलगाव (ता. हवेली) येथे भक्ती ग्राम संघ महिला महिला बचत गट, व फुलगाव ग्रामस्थ यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते .प्रारंभी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पुजा करण्यात आले.चाळीस महिला बचत गटातील महिला सहभागी झाल्या होत्या,
माजी सरपंच नारायणराव खुळे, प्रशासक शिरीष मोरे, राहुल वागस्कर , निर्मला वागस्कर, संध्या शिनगारे, उज्वला खुळे, शारदा वागस्कर , सिंधूताई खुळे, ग्रामविकास अधिकारी डी. के. पवार आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या, विविध उपक्रम उत्साहात पार पडले. महिला दिनानिमित्त प्रामुख्याने महिलांचा गौरव; तसेच स्वयंरोजगार मार्गदर्शन करण्यात आले.
विस्तार अधिकारी शिरीष मोरे म्हणाले महिला सर्व क्षेत्रात उंच भरारी घेत आहे अभिमान स्पद आहे ग्रामिण भागतील महिला शिक्षण, आरोग्य, आणि स्थानिक स्वराज्य संस्था मधील पदाधिकारी म्हणून उत्तम काम करीत आहेत तसेच बचत गटातील महिलांनी आता स्वयंरोजगार शोधून रोजगार व आर्थिक प्रगती करावी असे आव्हान त्यांनी केले.
महिला दिनाचे औचित्य साधत ग्रामस्थ व महिला बचत गट यांच्या वतीने प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच मंदानानी संपतराव साकोरे यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.राहुल वागस्कर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रियांका वंजारे यांनी सुत्रसंचलन केले,