सुनील भंडारे पाटील
वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथील माहेर संस्था नेहमी महिलांचे सक्षमीकरण हिरारीने करते.डॉ.राणी खेडकर. माहेर संस्थेमध्ये दरवर्षी प्रमाणे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
महिला सर्व कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहे.नविन आव्हानाला सातत्याने तोंड देवून अनेक क्षेत्रात ठसा उमटविणाचे कार्य महिला करित आहे.आणि माहेर संस्थेच्या माध्यमातून आपल्या सारख्या कर्तुत्वान महिलांचा सन्मान होणे हे माहेर साठी अभिमानास्पद आहे.महिला मध्ये बऱ्याच गोष्टीची आवड आहे.आवड असली म्हणजे प्रचंड जबाबदारीने काम सहजगतीने होते.फक्त महिलांना प्रोहत्सनाची गरज असते आणि त्यावेळी त्यांच्या अफाट क्षमतांचा वापर करुन कुटुंब, समाज, देश यांच्या विकासासाठी त्याकाम करतात. माहेर संस्था नेहमी महिलांच्या पुनर्वसन असो अथवा सक्षमीकरणा साठी हिरारीने काम करित आहे.महिला दिना निमित्त बचत गटातील महिलांनी व संस्थेतील ग्रूहमाता यांनी न्रुत्य सदर केले. हर्षदा सोनके यामुलीने सावित्रीबाई फुले यावर एकांकीकां केली. या वेळी सदर कार्यक्रमास बाल कल्याण समिति 1 च्या डॉ.राणी खेडकर, वैशाली गायकवाड, राव मैडम सदस्य बाल कल्याण समिति, सुनीता शिवले सरपंच आपटी,सोनाली वाजे पोलिस पाटील वाजेवाडी,पत्रकार पत्नी वैशाली शरद पाबळे , उर्मिला सुनील भंडारे, कावेरी शंकर पाबळे, हेमलता सुनील भांडवलकर, दक्षता समिति सदस्य शिक्रापूर पोलिस स्टेशन,संस्थेच्या अध्यक्षा हिराबेगम मुल्ला, सि. मीना परेरा, अनिता जाधव पेरणे फाटा, कोरेगाव भिमा,वढू,आपटी, वाजेवाडी, चौफुला, पिपंळे जगताप परिसरातील बचत गटातील महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या. तर बचत गट समन्वयक मंदा भोंडवे, अश्विनी बसवंती, कोमल माझंरे माहेर संस्थेतील कर्मचारी नीता सूर्यवंशी, अनिता दुतोंडे,संगीता चौधरी,राणी सकोरे,इग्नेशीया, जर्मन स्वयंमसेवक ऐना, वृषाली चव्हाण, स्वाती पाटील, नंदिनीताई,मिना भागवत, संध्या अडगळे,मनिषा शिंदे,निकिता वाटकर,आनंद सागर, राजेंद्र साकोरे,हरिश अवचर,प्रशांत गायकवाड,विष्णु सूर्यवंशी,सुमित इंगळे,विशाल सैंदाणे, संजय इंगळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन रमेश दुतोंडे तर आभार प्रदर्शन प्रकाश कोठावळे यांनी केले.