रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
सोनेसांगवी ता. शिरुर येथील एका किराणा दुकानातून ६५ हजार रुपयांचा किराणा माल चोरी गेल्याची घटना घडली होती. या बाबत रंविद्र गंगाराम डांगे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीसांत फिर्याद दिली असता पोलीसांनी या किराणा माल चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.१९ मार्च रोजी अज्ञात चोरट्याने दुकानातील तेलाचे डबे , काजु , बदाम , खारीक , बेसन बँग , मसाले , चहा पावडर आदी व रोख रक्कम असा ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला होता. या बाबत रविंद्र डांगे यांनी पोलिसांना खबर दिली असता पोलीसांनी तांञिक बाबी तपासून शोध घेतला विजय लक्ष्मण गलांडे (वय ३१) सासवड रोड , गोंधळेनगर ,हडपसर , पुणे सध्या राहणार पेरणे फाटा ता. हवेली यास २६ मार्च रोजी अटक केली असुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.