सुनील भंडारे पाटील
शिरूर तालुक्याच्या सर्वच भागामध्ये सद्यस्थितीत गेल्या अनेक दिवसांपासून युरिया खताचा तुटवडा भासत असून, युरिया खताची गोण शोधण्यासाठी आसपासच्या अनेक कृषी दुकानांमध्ये शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत आहे, तरी देखील युरिया खताची गोण मिळणे मुश्किल झाली आहे,
शिरूर तालुक्यामध्ये काही ठराविक औद्योगिक क्षेत्र वगळता सदन शेती क्षेत्राचा भाग मोठा आहे, खोडवा ऊस, नवीन सुरुची लागवड ऊस बांधणी साठी इतर खताबरोबर युरियाची देखील टाकणी गरजेचे आहे, त्याचप्रमाणे इतर तरकारी पिके, मका, तसेच इतर पिकांसाठी हिरवेपणा व काळोखी येण्यासाठी युरिया खताची नितांत गरज असते, परंतु तालुक्यामध्ये युरिया खताचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांची मात्र परवड होताना दिसत आहे, सद्यस्थितीत साखर कारखान्यांचा देखील गळीत हंगाम संपला असून, ऊसतोड झालेली खोडवा ऊस पिके पुन्हा जोमाने आणण्यासाठी युरिया खताची शेतकऱ्यांना नितांत गरज आहे, या भागात संबंधित खात्याने मोठ्या प्रमाणात एरिया खत उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकरी करत आहेत,
शिरूर तालुक्यासाठी 11000 टन युरिया ची तरतूद आहे, तसेच 10900 पुरवठा चे नियोजन आहे, प्रत्यक्षात 8500 टन युरिया आत्तापर्यंत पुरवठा झाला आहे, 3000 टन युरिया पुरवठा बाकी आहे, केंद्र शासनाने शेतकऱ्यांना युरिया देण्यासाठी एक मशीन व त्यामध्ये सॉफ्टवेअर बनवले आहे, या सॉफ्टवेअर मध्ये माहिती भरण्यासाठी कृषी दुकानदारांकडून नाव, आधार कार्ड, जात ही माहिती भरावी लागते, सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे जातीची माहिती देताना शेतकऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याने, युरिया चा स्टॉक असताना संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना पुरवठा केला जात नाही असा गंभीर प्रश्न विधानसभेत देखील उपस्थित झाला आहे, हे सॉफ्टवेअर थांबवण्यासाठी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पत्र देणारा असून पुढच्या आठ दिवसांमध्ये युरियाचा पुरवठा सुरळीत होईल, शेतकऱ्यांनी गडबडून जाऊ नये आणि धावपळ करू नये,
-:## अमित रणवरे कृषी अधिकारी, शिरूर ## :-