3000 रुपयांची लाच घेताना बारामती शहर पोलीस स्टेशन चा पोलीस शिपाई अँटीकरप्शनच्या जाळ्यात

Bharari News
0
 सुनील भंडारे पाटील
            बारामती शहर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथील पोलीस शिपाई लाच स्वीकारले प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी 3,000/- रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडला,       
     बारामती शहर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर 232/ 2023 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, लोकसेवक  संतोष जगन्नाथ पवार (वय 39 वर्ष) पोलीस शिपाई बारामती शहर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण याला 3,000 रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे, यातील तक्रारदार यांनी भाड्याने घेतलेल्या फ्लॅटसाठी दिलेल्या डिपॉझिट ची रक्कम घरमालक परत देत नसल्याबाबतची तक्रार पोलीस विभागाच्या 100 नंबर वर डायल करून केली होती, या तक्रारीची पाठपुरावा करण्यासाठी पोलिसांचा वेळ गेला म्हणून मोबदला स्वरूपात संतोष पवार याने 3,150/- रुपये लाच मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांना प्राप्त झाली होती, सदर तक्रारीची पडताळणी केली असता तक्रारदार याच्याकडे तडजोडी अंति 3,000/- रुपयांची मागणी करून ती रक्कम स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले, या संदर्भात बारामती शहर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करत आहेत,
            सदरची कारवाई पोलीस उपायुक्त / पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने केली,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!