ज्ञानेश्वर मिडगुले - सणसवाडी
सणसवाडी (ता .शिरूर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झालेल्या सुवर्णा रामदास दरेकर यांचा सणसवाडी ग्रामस्थांतर्फे पुष्पगुच्छ देवून सत्कार करत कारकिर्दीसाठी शुभेच्छाही दिल्या .
सरपंचपद हे मानाने डोक्यावर मिरवायचा जिरेटोप नसून कार्यकर्तव्याने भरावयाचे माप आहे याची जाणीव असून मी ते विकास कामाद्वारे पुर्णपणे भरावयाचा प्रयत्न करील असे सत्कार प्रसंगी बोलताना सुवर्णा दरेकर यांनी सांगत सर्वांचे आभार मानले . यावेळी शिरूर तालुका काँग्रेस अध्यक्ष वैभव यादव , जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडीत आप्पा दरेकर, माजी सरपंच युवराज दरेकर ,भाजपा कार्यकारीणी सदस्य बाळासो सैद , सोसायटीचे चेअरमन सुहास दरेकर, गोरक्ष दरेकर , माजी उपसरपंच अँड विजयराज दरेकर , नवनाथ दरेकर ,सागर दरेकर , अनिल दरेकर, रामदासनाना दरेकर , नवनाथ हरगुडे आदी उपस्थीत होते . माजी सरपंच दता हरगुडे यांनी भावी कार्यास शुभेच्छा दिल्या .