सुनील भंडारे पाटील
लोणीकंद (ता हवेली) येथील श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग डिपार्टमेंट व Sofcon India Pvt. Ltd ह्यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी एक आठवड्याच्या E-Plan सॉफ्टवेअर कार्यशाळेंचा उदघाटन समारोह नुकताच महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये पार पडला. महाविद्यालयातील एकूण ७० पेक्षा अधिक विद्यार्थी या कार्यशाळेमध्ये सहभागी झाले होते.
याप्रसंगी श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मारुती बाप्पू भूमकर यांनी जागतिकीकरणानुसार बदललेल्या धोरणांचा व वाढत चाललेल्या औद्योगीकरणातील व्यवसाय व करिअरच्या संधी यासाठी विद्यार्थ्यांना या कार्यशाळेचा नक्कीच फायदा होणार असल्याचे मत व्यक्त केले तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मागर्दर्शन केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अविनाश देसाई यांनी विद्यार्थ्यांना E-PLAN सॉफ्टवेअरचे फायदे व भविष्यातील संधी या विषयी माहिती देताना सांगितले की विद्यार्थ्यांनी तांत्रिक कौशल्य आत्मसात करावे जेणेकरून त्यांना भविष्यातील करिअरच्या संधी उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे Sofcon India Pvt. Ltd चे शुभम शर्मा , अनुक्रिर्ती यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .या समारोह कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती पुरोहित, यांनी केले तर प्रा. प्रिया पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यशाळेंचे संपूर्ण नियोजन प्रा. व्ही .एम .राव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. ज्ञानेश्वर नेमाने, प्रा. अनुपम जैन, प्रदीप भंगाळे, रणदीवे यांनी केले.