सुनिल भंडारे पाटील
१७ वर्षाखालील कुमार राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा गोंडा(उत्तर प्रदेश) येथे १५ ते १८ एप्रिल रोजी होत आहे.या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी महाराष्ट्र कुस्ती संघाची निवड १० एप्रिल रोजी बालेवाडी,पुणे येथे पार पडली.यामध्ये १७ वर्षाखालील कुमार राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला असल्याचे माहिती देताना कुस्तीगीर संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष पै.संदिप भोंडवे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातून ४१५ कुस्तीगीरांनी या निवड चाचणी मध्ये सहभाग नोंदवला होता.या निवड चाचणीस पै.हनुमंत गावडे,पै.विलास कथुरे,पै.संदीप भोंडवे,पै.योगेश दोडके ,पै.मेघराज कटके,पै.नवनाथ घुले,पै.संतोष माचुत्रे,पै.दिनेश गुंड हे पदाधिकारी सह ही स्पर्धा पार पाडण्यासाठी २५ पंच उपस्थित होते.
*महाराष्ट्राचा निवडलेला संघ खालील प्रमाणे:-*
*[फ्रीस्टाईल कुमार:-*
४५ कीलो-सुजित जाधव(ठाणे),४८ कीलो-विशाल शिळीमकर(पुणे),५१ कीलो-रोहन भडांगे(नाशिक),५५ कीलो-सुशांत पाटील(कोल्हापूर),६० कीलो-विकास करे(सोलापूर),६५ कीलो-सुमित भारस्कर(बीड),७१ कीलो-आदर्श पाटील(कोल्हापूर),८० कीलो-श्रेअस गाट(कोल्हापूर),९२ कीलो-श्रीधर गोडसे(सातारा),११० कीलो-आर्यन पाटील(सोलापूर)..]
*[ग्रिकोरोमन कुमार:-*
४५ कीलो-अतुल ढवरी(सांगली),४८ कीलो-सिध्दनाथ पाटील(कोल्हापूर),५१ कीलो-उत्कर्ष ढमाळ(सातारा),५५ कीलो-समर्थ म्हालवे(कोल्हापूर),६० कीलो - प्रणव चौधरी(ठाणे),६५ कीलो-वैष्णव आडकर(पुणे),७१ कीलो-सोनबा लवटे(लातुर),८० कीलो-आतिष आडकर(पुणे),९२ कीलो-सोनबा लवटे(लातुर),११० कीलो-बालाजी मेटकरी(सोलापूर)..]
*[महीला कुमार:-*
४० कीलो-श्रावणी लवटे(कोल्हापूर),४३ कीलो-वीना गंधवाले(कोल्हापूर),४६ कीलो-गौरी पाटील(कोल्हापूर),४९ कीलो -वैभवी मासाळ(पुणे),५३ कीलो - अहिल्या शिंदे(पुणे),५७ कीलो-प्रगती गायकवाड(पुणे),६१ कीलो-सावरी सातकर(पुणे),६५ कीलो-सिध्दी खोपडे(पुणे),६९ कीलो-शिवानी मेटकर (कोल्हापूर),७३ कीलो-लावण्या मॅडम(पुणे)