सुनील भंडारे पाटील
श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा लोणीकंद (तालुका हवेली) येथे महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती(बापू) भूमकर, प्राचार्य डॉ अविनाश देसाई, प्रा. बोरुडे , प्रा. बोलाडे, प्रा. गुणवरे, प्रा. चौरे, प्रा. सैय्यद यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.
या प्रसंगी संस्थापक श्री मारुती भूमकर यांनी विद्यार्थी वर्गाला महात्मा फुले यांच्या मुळे आज सर्व जाती धर्माच्या मुलीं-मुलांना शिक्षण मिळाले हे स्मरणात ठेवले पाहिजे आणि मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर समाजासाठी करावा असे आवाहन केले , प्राचार्य अविनाश देसाई, बोकडे सर, जमदाडे सर यांनीही मनोगत व्यक्त केले या वेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख तसेच प्राध्यापक वर्ग विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारीही उपस्थित होते कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रा, आकाश चौरे यांनी तर आभार हुडे मैडम यांनी मानले.