कोरेगाव भीमा आणि परिसरातील गावांमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
             कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक ( तालुका शिरूर), पेरणे,लोणीकंद ( तालुका हवेली ) आणि परिसरातील गाव मध्ये आज सायंकाळी अवकाळी च्या पावसाने जोरदार हजेरी लावली, सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस पडत होता,  
    गेल्या दोन दिवसापासून आकाश ढगमय झालेली होते, वातावरणामध्ये माणसांसाठी असह्य उष्णतेची लाट उसळली होती, गेल्या दोन दिवसापासून आकाशातील वातावरण पूर्ण डगमय झाल्यामुळे  आज सायंकाळी अचानक सुसाट वारे, वादळाबरोबर पावसाने जोरदार हजेरी लावली, वाढत्या उष्णतेपासून पावसामुळे सुटका मिळाली असली तरी हा पाऊस शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा आहे, अवकाळी पाऊस ऊस पिकाला फायद्याचा असला तरी, तरकारी पिके, गहू,हरभरा, उन्हाळी बाजरी या पिकांना मात्र हा पाऊस घातक ठरणार आहे, वेगाने वाहणारे वारे, चक्रीवादळ, जोरदार पावसामुळे पिके भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहेत, गरज असताना पाऊस पडत नाही आणि निसर्गाचा समतोल बिघडल्याने नको त्यावेळेस अवकाळी पाऊस पडल्याने मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे, आज सायंकाळी कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, पेरणे,लोणीकंद तसेच परिसरातील सर्व गावांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली,
वढू बुद्रुक मधील रानोबाची वाडी या ठिकाणी बाबाजी कोंडीबा भंडारे यांच्या एका नारळाच्या झाडावर वीज पडल्याने ते झाड भर पावसात धडधडा जळू लागले, हे दृश्य लोकांनी पाहिले, या भागामध्ये जोरदार विजांचा कडकडाट सह जोरदार पाऊस झाल्याने लोकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण तयार झाले 
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!