*रस्त्याच्या दुतर्फा बाजूंनी मुरुमा ऐवजी टाकली जातेय माती;कामाची चौकशी करा:-पै.किरण साकोरे*
*-[आळंदी,तुळापूर-लोणीकंद रस्त्याचे नूतन काम चालू असताना माती टाकण्याचा प्रकार]-*
सुनिल भंडारे पाटील
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने आळंदी ते तुळापूर,फुलगाव,लोणीकंद रस्त्याचे काम चालू असून या चालू कामामध्ये तुळापूर ते लोणीकंद गावातील हद्दीतील रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूंनी ठिकठिकाणी कामाच्या गुणवत्ता नियमाप्रमाणे मुरूम टाकला जातो.परंतु त्याठिकाणी मुरूमा ऐवजी चक्क माती टाकून रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साईट पट्ट्या चुकीच्या पद्धतीने भरण्याचे काम चालू असून यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जेसीबी मशीनद्वारे खांदून खड्डे करून तीच माती साईडपट्टे भरण्यासाठी चुकीच्या पद्धतीने वापरली जात असल्याचे रस्त्याची पाहणी करून माहिती देताना फुलगावचे युवा नेते पैलवान किरण साकोरे यांनी सांगितले.
बऱ्याच वर्षानंतर या रस्त्याचे नूतन काम शासनाच्या मोठ्या निधीतून मंजूर होऊन चालू आहे.रस्त्याचे सर्वच काम खरे तर दर्जेदार होईलाच हवे आहे.कारण या रस्त्यावर वाहनांची,प्रवासी वर्दळ मोठ्या प्रमाणत आहे.तर महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर महाराज यांचे धार्मिक आळंदी हे गाव स्थळ आहे.तर या रस्त्याला छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी पुण्यस्थळ श्री क्षेत्र तुळापूर आहे.त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने हा रस्ता महत्वाचा मार्ग मानला जात असल्याचे साकोरे यांनी सांगितले.
या रस्त्याच्या कामाच्या टेंडर प्रमाणे गुणवत्तापूर्ण काम होईला पाहिजे ते होताना दिसत नाही.त्यामुळे या पूर्ण कामाची सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकारी व वरिष्ठ लोकप्रतिनिधी यांनी पाहणी करून कामाची चौकशी करावी.अशी मागणी किरण साकोरे यांनी केली आहे.
[मागे या रस्त्याच्या कामाची पाहणी केली होती,व्यवस्थित काम चालू नसेल तर कामाची पुन्हा येऊन पाहणी करू.तसेच सबंधित सुपरवाईजर,कंत्राटदार यांना सूचना करू.
*-जान्हवी रोडे,बांधकाम अभियंता, सार्वजनिक बांधकाम खाते,पूर्व हवेली विभाग]*
[रस्त्याच्या साईड पट्ट्याला जर माती टाकली असेल तर ती काढून मुरूम टाकू.कुठे कुठे माती टाकली असेल ती पाहून योग्य ते काम करू.
*- कामताप्रसाद तिवारी,सुपरवाईजर-आळंदी,तुळापूर-लोणीकंद रस्ता]*