सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथील ज्येष्ठ पत्रकार काळूराम दिनकर गव्हाणे ( केडी भाऊ ) वय 58 वर्ष यांचे आज सकाळी आठ वाजता अपघातानंतर वैद्यकीय प्रदीर्घ इलाजा दरम्यान अचानक त्यांची प्राणज्योत मालवली,
पत्रकारिता क्षेत्रातील एक तारा हरपल्याने कोरेगाव भीमा गाव, सर्व पत्रकार बांधव, मित्रपरिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, के डी भाऊ यांनी पत्रकारिता क्षेत्रामध्ये सुमारे 30 वर्ष समाजाची सेवा केलेली आहे, पूर्वीच्या काळी सुधारित तंत्रज्ञान नसताना के डी भाऊ माध्यमांसाठी बातम्या हाताने लिहून लिफाफे मध्ये टाकून एसटीच्या साह्याने शहरांमध्ये पाठवत असत केडी भाऊंनी आपल्या जीवनामध्ये पत्रकारिता करत असताना अनेक मित्र जोडले, त्यांनी पत्रकार संघटनेवर देखील नेतृत्व केले आहे, समाजामध्ये अनेक क्षेत्रामध्ये त्यांची कामगिरी उल्लेखनीय असून, त्यांनी अनेक आदर्श पत्रकार पुरस्कार घेतलेली होते, त्यांनी आपल्या जीवनात अनेक पत्रकार घडवण्याचे काम केले, ते पत्रकारांचे आधारस्तंभ होते, त्यांनी दैनिक प्रभात, दैनिक लोकसत्ता, दैनिक लोकमत या वृत्तपत्रांसाठी काम केले असून, ते सुयश विद्यार्थी दिनदर्शिकाचे संपादक होते,
साधारणतः एक महिन्यापूर्वी पुणे नगर महामार्गावर लोणीकंद पावर हाऊस येथे रात्री 7:30 वाजता त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, त्यांना तातडीच्या सेवेसाठी वाघोली येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, त्यानंतर आमदार अशोक बापू पवार, सुजाता भाभी पवार यांच्या मदतीने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले परंतु अनेक दिवसांच्या उपचारा दरम्यान त्यांची प्राण ज्योत आज मालवली,