श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनीअरींग मध्ये विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स प्रोसेस ऑटोमेशन सॉफ्टवेअर कार्यशाळेंचे आयोजन

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील 
      लोणीकंद (ता हवेली) येथील श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अर्टिफिसिअल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स डिपार्टमेंट व क्लाऊड टेकनो सॉफ्ट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने  विद्यार्थ्यांसाठी एक आठवड्याचे रोबोटिक्स प्रोसेस ऑटोमेशन (RPA -UI PATH ) या सॉफ्टवेअर कार्यशाळेंचा उदघाटन समारोह नुकताच महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये पार पडला. महाविद्यालयातील एकूण १४५ पेक्षा अधिक विद्यार्थी या कार्यशाळेमध्ये सहभागी झाले होते.   
  याप्रसंगी श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष  मारुती (बाप्पु) भूमकर यांनी  जागतिकीकरणानुसार बदललेल्या धोरणांचा व  वाढत चाललेल्या  डिजिटल औद्योगीकरणातील व्यवसाय व करिअरच्या संधी यासाठी विद्यार्थ्यांना या कार्यशाळेचा नक्कीच फायदा होणार असल्याचे मत व्यक्त केले  तसेच  उपस्थित  विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मागर्दर्शन केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अविनाश देसाई यांनी विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअरचे फायदे व भविष्यातील संधी या विषयी माहिती देताना सांगितले की विद्यार्थ्यांनी तांत्रिक कौशल्य आत्मसात करावे जेणेकरून त्यांना भविष्यातील करिअरच्या संधी उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे  कार्यशाळेचे मार्गदर्शक क्लाऊड टेकनो सॉफ्ट कंपनीचे अक्षय कुलकर्णी व सीमा मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून, विद्यार्थ्यांना RPA -UI PATH चे ट्रैनिंग दिले व भविष्यामध्ये या सॉफ्टवेरचा उपयोग कसा होईल या विषयी माहिती दिली. या समारोह कार्यक्रमास  महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. या कार्यशाळेंचे संपूर्ण नियोजन अर्टिफिसिअल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स पार्टमेंटच्या विभाग प्रमुख  प्रा. डॉ. सुजाथा राव  यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रा. विकास गायकवाड , प्रा. गणेश केंद्रे , प्रा. गिरिशा बोंबले, प्रा. गीतांजली कडलग, प्रा. तृप्ती फरांदे, प्रा. तेजस्वी हुडे व अश्विनी स्वामी यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!