सणसवाडीच्या सरपंचपदी सुवर्णा रामदास दरेकर बिनविरोध

Bharari News
0
सणसवाडी प्रतिनीधी
      जिल्ह्यामध्ये अग्रेसर अशा सणसवाडी (ता . शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी सुवर्णा रामदास दरेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी विकास फुके व ग्रामविकास अधिकारी बाळनाथ पवने यांनी जाहीर केले .   
 सरपंच संगीता नवनाथ हरगुडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवड झाल्याने गावातून भैरवनाथ मंदिरापर्यत झांजपथक वाजंत्री बेन्जो पथकाच्या निनादात गुलालाची उधळण करत भव्य अशी मिरवणुक काढून मंदिरामधे अभिनंदन करण्यासाठी सभा झाली . यावेळी सरपंच परिषदेच्या जिल्हाध्यक्षा सुवर्णा दरेकर , माजी सरपंच संगिता हरगुडे व ग्रामस्थांच्या हस्ते नवोदीत सरपंच सुवर्णा दरेकर यांचा सत्कार करणेत आला . सणसवाडीच्या विकासासाठी व नागरीकांचे प्रश्न समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नरत राहीन , असे सुवर्णा दरेकर यांनी सांगीतले . पती रामदास दरेकर यांचे नेतृत्व , वक्तृत्व , कर्तुत्व याचा उपयोग करून नक्कीच विकास कामांचा विक्रम करीन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला . विशेष म्हणजे सरपंच पदी निवड झाल्याने सुवर्णा रामदास दरेकर यांनी ग्रामदैवत भैरवनाथ मंदीराची लाखो रुपये खर्चुन फुलांची आरस केली .     
 सणसवाडी गावाने आळंदीमध्ये घेतलेल्या धर्मशाळेसाठीही एक लाख रुपयांची देणगी रामदास दरेकर व परिवाराने देण्याचे सुतोवाच केले . यावेळी माजी उपसरपंच विजयराज दरेकर , सागर दरेकर , उपसरपंच दतात्रय हरगुडे, स्नेहल भुजबळ , रुपाली दगडू दरेकर , राहूल हरगुडे , अक्षय कानडे , शशीकला सातपुते , ललीता दरेकर , नवनाथ हरगुडे , सोसायटी व ग्राम पंचायतीचे आजी माजी सदस्य व ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी कामगार नेते व ग्रामपंचायत सदस्य राजुअण्णा दरेकर इतरांनी सहकार्याबदल सर्वांचे आभार मानले . याप्रसंगी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर ' जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडीत दरेकर , सभापती मोनिका हरगुडे, माजी उपसभापती आनंदराव हरगुडे , माजी सरपंच दता हरगुडे, नवनाथ दरेकर ,पॅनल प्रमुख युवराज दरेकर , कॉंग्रेस आय तालुकाध्यक्ष वैभव यादव, दगडू दरेकर , राजेश भुजबळ , रमेश सातपुते , माजी उपसरपंच बाबासो दरेकर , सुनिता दरेकर , संभाजी साठे, चेअरमन काळुराम दरेकर , सुहास दरेकर , रामभाऊ दरेकर , अनिल दरेकर , प्रशांत दरेकर , सुखदेव दरेकर , अश्विनी दरेकर , श्रीधर दरेकर , आदिनाथ हरगुडे, काळुराम हरगुडे ,  सतीशतात्या दरेकर,महादेव दरेकर बचतगटाच्या अध्यक्ष अलकाताई दरेकर, व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!