सणसवाडी (ता शिरूर) येथील सणसवाडी जिल्हा परीषद शाळेत मुख्याध्यापक सुरेश भंडारे व मान्यवरांचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करणेत आले .
यावेळी महामानवाचे जिवनावर तनुजा झेंडे ,अरुष दरेकर व विद्यार्थ्यांनी विचार व्यक्त केले . रविंद्र गायकवाड , सुधाकर मंचरकर , पोपट इंगवले आदिंनी बाबासाहेबांचे जिवणावर भाष्य केले . भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेबांचे जिवणावर प्रश्न विचारत योग्य उतरे देणाऱ्या प्राची सुतवने व विद्यार्थ्याना बक्षीस देण्यात आले, यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सणसवाडी या शाळेमधील सर्व विद्यार्थी, तसेच शिक्षक वृंद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, याप्रसंगी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी मार्गदर्शन करण्यात आले,