महागणपतीला आंब्यांची आरास कमळाच्या फुलांचा हार

Bharari News
0
रांजणगाव गणपती संभाजी गोरडे 
           येथील रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट च्या ९६  एकरवरील काही क्षेत्रात लावलेल्या आंब्याच्या झाडाच्या  आंब्यांची महागणपती ला आरास केली आहे आणि महागणपती उद्यानातील असलेल्या कमळाच्या फुलांचा हार महागणपती ला घालण्यात आला असल्याची माहिती देवस्थान ट्रस्ट च्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी दिली.       
   कोरोना काळात रांजणगाव महागणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने महागणपती मंदिराच्या ९६ एकर क्षेञापैकी काही भागात केसर आंब्यांची लावगड केली होती. देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात या केशर जातीच्या आंब्यांची लावगड करुन जोपासना केली आहे. 
      सदर आंब्यांची आरास श्रीं च्या मुर्ती समोर करण्यात आली होती. व दुसऱ्या दिवशी देवस्थानच्या कर्मचा-यांना प्रसाद म्हणुन वाटप करण्यात आले असल्याचे देवस्थान ट्रस्टच्या  अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!